"नाडगौड" इतिहासातील एक दुर्लक्षित पान ..
जुन्या काळी मोकासा, सरदेशमुखी , पाटीलकी , कुळकर्णी, देशपांडे ह्या वतन विषयक संज्ञा अस्तित्वात होत्या. त्याच धर्तीवर " नाडगौड" हे देखिल एक पद अस्तित्वात होते. परंतु अनेक इतिहासकारांच ह्या वंशपरंपरागत हक्काकड़े दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. नावावरूनच लक्षात येते की हा शब्द कानडी असावा. ह्या नावाचा उल्लेख खास करून मौखिक साधनात येतो. तो असा शिखर शिंगणापूर च्या पायथ्याशी असणाऱ्या नातेपुते गावचा पाटील म्हनजे पांढरे घराण्यातील आबगौड व त्याचा भाऊ दुष्काळामुळे गायी चारण्यासाठी कर्नाटक भागातील विजापूर कड़े गेल्याचे मौखिक साधनात सांगितलं आहे. (संदर्भ सागर माने यांची कवलापुर येथील महासिध्द मंदिरात गायलेली ओवी ) त्यानंतर नाडगौड संदर्भात विस्तृतपणे आलें आहे ते संतोष पिंगळे यांच्या सरंजामी मरहट्टे या संदर्भ ग्रंथात. त्यातील उल्लेख पुढील प्रमाने त्याचे स्वरूप चौथाई च्या शेकडा दोन टक्के रक्कम ही नाडगौडी स्वरुपात दिली जाते. ही रक्कम छ शाहु नी आपल्या मर्जीतील काहि सरदारांनाच दिली होती. नाडगौडा , नाडगावडा ह्यातील नाडू म्हनजेच प्रांत अथवा जिल्हा आणि गावडा म्हनजे गौड त...